रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, जे 1 जूनपासून लागू होतील. या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास चालकाला 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच, अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडल्यास 25,000 रुपये दंड आणि वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. अल्पवयीन व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.
वाहतूक नियमांमध्ये बदल: 1 जूनपासून अमलात येणारे नवीन नियम:
1 जूनपासून वाहतूक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियमानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड लागू शकतो. अतिवेगाने वाहन चालवल्यास 1,000 ते 2,000 रुपये दंड होऊ शकतो, तर लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.
अल्पवयीन व्यक्तींना 25,000 रुपये दंड:
भारतात ड्रायव्हिंगचे वय 18 वर्षे आहे. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास त्याला 25,000 रुपये दंड होईल. तसेच, अशा व्यक्तीला वयाच्या 25 वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.
नवीन नियम आणि दंडाच्या सविस्तर माहितीसाठी वाचा:
हे बदल अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आणि सुरक्षिततेत सुधारणा करण्यास मदत करतील. अशा नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी चालकांनी नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.